" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

Tuesday, 5 May 2020

10 वी व 12 वी e-Marksheet




         🅾️    ई-मार्कशीट ( 10 वी व 12 वी)   🅾️
        
                    Download on One click
    
          
            मित्रांनो जर तुमचे 10 वी ,12 वीचे गुणपत्रक , उत्तीर्ण प्रमाणपत्रक  गहाळ झाले असेल,कुठे ठेवले गेले असेल आणि ते तुमच्या शैक्षणिक कामासाठी तात्काळ आवश्यक असेल तर आता मुळीच चिंता करायची नाही,कारण महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी सुरु केलंय e-marksheet web portal.........या पोर्टलच्या माध्यमाने तुम्हाला तुमचे 10 वी(S.S.C)  व 12 वी (H.S.C) चे गुणपत्रक व उत्तीर्ण प्रमाणपत्रक सहज download करता येतील, तेही तुमच्या मोबाईलवर...
 
ईमार्कशीट म्हणजे काय? 👈👈

ई-मार्कशीट एसएससी (दहावी परीक्षा) / एचएससी (१२ वी परीक्षा) साठी "गुणपत्रके" आणि "उत्तीर्ण प्रमाणपत्र" च्या ऑनलाइन सत्यापनासाठी एक वेब पोर्टल आहे आणि त्यावर 1990 पासून ते मागच्या वर्षापर्यंतचा डेटा उपलब्ध करून दिला आहे..तसेच हा डेटा दरवर्षी नवीन निकालासह अद्यान्वित केला जातो..
             महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचई) नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (मेईटीवाय) भारत सरकारच्या सहकार्याने एसएससी (इयत्ता दहावी) आणि बारावी (बारावी) गुणपत्रके या पोर्टलवर उपलब्ध करुन दिली आहेत.
ई मार्कशीट हे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी, शाळा,महाविद्यालये,  इत्यादीना माहिती / सेवा विनामुल्य वितरण करण्यासाठी एस.एस.सी. (दहावी) आणि बारावी (१२ वी) चे गुणपत्रकांच्या ऑनलाइन पडताळणीचे प्रमाणपत्र आहे.  हे राज्य विकास मंडळाच्या सहकार्याने एनआयसी, पुणे  यांनी विकसित केले आहे.
        
                             👇 Click here 👇

                  How to download e-marksheet pdf

   
                         👇 Link of portal👇
   
                          e Marksheet Portal
   



     ********************************************
                                    
                                    माहिती संकलन
                            🙏श्री.प्रमोद निंबा बोरसे🙏

No comments:

Post a Comment

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...