" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

न्यायमूर्ती रानडे

          
               🔵🔷न्यायमूर्ती रानडे🔷🔵
           

           जन्म:- 18 जानेवारी 1842
           मृत्यू :-16 जानेवारी 1901
           नाव:- महादेव गोविंद रानडे
    
         "महाराष्ट्र ज्यावेळी थंड गोळा होऊन पडला होता त्यावेळी हर प्रयत्नाने त्याला उब देऊन नवचैतन्य निर्माण केले ते न्यायमूर्ती रानडे यांनी." अशा आशयाचे उद्गार लोकमान्य टिळकांनी ज्यांच्याबद्दल काढले असे न्यायमूर्ती रानडे उत्कृष्ट लेखक, अर्थशास्त्रज्ञ ,इतिहास विशारद, चिकित्सक म्हणून नावाजलेले होते. खरेतर न्यायमूर्ती रानडे यांच्या काळात देशात अतिशय बिकट परिस्थिती होती. महाराष्ट्रात तर चैतन्यहीन, दिशाहीन  करून सोडणारा काळ होता. परकीय सत्ता प्रकट झाली होती नवी संस्कृती नवे आचार-विचार परंपरा सांगणारी होती. त्यामुळे जनतेला नेमके कसे वागावे हेच समजत नव्हते. अशा परिस्थितीत न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या अभ्यासातून मार्ग शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
       सामान्य जनतेची प्रगती व्हावी आणि राज्यकर्त्यांनी त्यास विरोध करू नये अशा धोरणाने त्यांनी एक-एक उद्योग हाती घेतले व ते जनतेमध्ये पोहचवून यशस्वी केले. वृत्तपत्रे, वसंत व्याख्यानमाला याद्वारे जनतेला शहाणे करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाची निर्मिती केली व व्यापक धर्मतत्त्वांची ओळख करून दिली. पुनर्विवाह उत्तेजक संस्थांद्वारे सामाजिक सुधारणांना चालना दिली. सार्वजनिक सभेद्वारे राजकीय जागराचे आणि उद्योगाचे मार्ग काढले. त्यांची मंद वाटचाल पण भक्कम स्वरूप यामुळे ते नावारूपाला आल्याचे दिसून येते.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

No comments:

Post a Comment

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...