🔴 लाला लजपतराय 🔴
जन्म :-28 जानेवारी 1865 जगराण, लुधियाना- पंजाब.
मृत्यू:- 17 नोव्हेंबर 1928.
नाव :- लाला राधाकिशन लजपतराय.
नाव :- लाला राधाकिशन लजपतराय.
लाला लजपतराय हे पंजाबचे एक श्रेष्ठ देशप्रेमी नेते होते. त्यांचा क्रांतिकारक चळवळीशी संबंध असल्याचा संशयावरून इंग्रज सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात ठेवले. पुढे लालाजी व सरदार अजितसिंग यांना 9 मे 1907 ला सीमापार केले नंतर त्यांची सुटका केली. लाला लजपत राय यांनी आर्य समाजाची फार मोठी सेवा केली. पंजाबच्या सार्वजनिक चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. 1928 साली सायमन कमिशनला विरोध दर्शविण्याकरीता देशभर चळवळ सुरू होती. पंजाब मध्ये सायमन कमिशनला विरोध करणारी चळवळ दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न चालू होता. लाहोर येथे 30 ऑक्टोबर 1928 रोजी सायमन कमिशनला विरोध दर्शवणे करिता लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. लालाजी आघाडीवर होते .रेल्वे स्टेशनकडे मोर्चा जात असता, काटेरी तारेचे कुंपणांमुळे सर्व जण तेथे थांबले. मिरवणुकीचा जमाव फार मोठा असतानाही अत्यंत शांतता राखली होती. तरीही जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केला. लालाजींनाही पुष्कळ मार बसला. त्यांच्या छातीवर लाठीचा जोराचा मार बसल्याने छातीला इजा झाली. लालाजींच्या छातीवर उन्मत्त सॉडर्सने जोराने मुठी वळून मारल्याने ते अत्यंत जखमी झाले. त्यातच 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वातंत्र्याच्या चळवळीत लालाजी हुतात्मा होऊन अमर झालेत.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

No comments:
Post a Comment