1.ससा नि कासव
एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे चाली भो. मंग दोन्हीस्मा दौडानी शर्यत लागस.समोरना पिप्पयना झाडले जो पहीले टीपी तो शर्यत जिकी असं ठरणं.
शर्यत सुरु व्हस, ससा हाइ जोर जोरमा उड्यामारीस्नी पुढे निंघी जास कासव आपलं बागेबागे -बागेबागे जास. ससा जोर जोरमा उड्या मारत मारत भलताच पुढे निंघी जास.तठे त्याले दिखस गाजरेस्ना मया.ते दखीसन ससाना तोंडले पाणी सुटस आणि तो बागेच त्या गाजरेस्ना मयामा गाजरे खावाले घुशी जास.ससा त्याना पोट भरस तव गाजरे खास.ससा मांगे फिरी कासवले दखस,त कासव भलताच दूर दिखावस.ससा आखो पुढे दौड लगावस,आखो पुढे जाईसन त्याले मुयासनां वावर दिखस,ते देखीसन आखो त्याना तोंडले पाणी सुटस.मंग काय! तो आथा-तथा देखीसन शिध्धा मुयासनां वावरमा घुशिसन मुय्या खावाले लागी जास.
पहिले गाजरे आणि आते मुया खाईसन त्यानं पोट बोंब भरी जास,आते उड्या मारनं ते सोडा त्यानी चालानीभी पंचाईत व्हुई जास.तो एक झाड दखस आणि थोडा आराम करो, असं त्याले वाटस.ससा मांगे फिरी कासवले देखस, कासव आजूनभी भलताज मांगे दिखस.ससा त्या झाडणी थंडीगार सावलीमां बठस,त्याले जमाया येवाले लागतीस आणि तो झोपी जास.आथा कासव आपला बागेबागे चालतच –हास.त्याले झाडनाखाले ससा झोपेल दिखस, पण तो काही त्याले उठाळत नही,आणि बागेबागे चालत ठरेल परमाने पिप्पयना झाड जागे भिडी जास.
No comments:
Post a Comment