🔵 पितामह दादाभाई नवरोजी🔵
मृत्यू :-18 एप्रिल 1817
नाव:- दादाभाई नवरोजी.
'सुराज्याला स्वराज्याची सर येणार नाही,आम्हाला स्वराज्य पाहिजेच' असे इंग्रज सरकारला ठासून सांगणारे पितामह दादाभाई नवरोजी अतिशय बुद्धिमान व्यक्ती होते.वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांच्या निर्वाणानंतर आईसोबत राहू लागले.पुण्यात कॉलेजचे शिक्षण घेऊन तेथेच प्राध्यापक म्हणून काम करू लागले.त्यांना वाचन,मनन व खेळण्यात खूपच रस होता.
मुलांबरोबर मुलींना सुद्धा शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी शाळा काढल्या. त्यांनी एक वर्तमानपत्रही काढले. त्याचे नाव 'रास्तगोफ्तार ' होते ते गुजराती भाषेतून निघत असे. आपल्या समाजाची सुधारणा होण्यास शिक्षण हाच उपाय आहे, असे त्यांना वाटे. व्यापाराकरिता दादाभाई इंग्लंडला गेले होते. भारतातील लोक अज्ञानी आणि रानटी आहेत असे तेथील लोक समजत. त्यावर त्यांनी व्याख्याने लेख लिहून आपली प्रखर मते मांडली. तर देशात सुधारणा घडविण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे चार उपाय दादाभाईंनी देशाच्या प्रगतीसाठी आचरणात आणावयास सांगितले. त्यामुळे त्यांना पितामह म्हणून संबोधले जात होते.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

No comments:
Post a Comment