" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

सरदार वल्लभभाई पटेल


             🔴 सरदार वल्लभाई पटेल 🔴


जन्म:- 31 ऑक्टोंबर 1875 करमसद , गुजरात.
मृत्यू:- 15 डिसेंबर 19 50
नाव:- वल्लभभाई झवेरभाई पटेल.
       
        "भारतीय संघराज्याच्या निर्माता" आणि "भारताचे पोलादी पुरुष" म्हणून ज्यांची ख्याती अजरामर आहे, असे थोर महात्मे सरदार वल्लभाई पटेल यांना भारतीय नागरिक कधीही विसरू शकणार नाहीत. सरदारांचा कणखरपणा धीटपणा हा त्यांच्या वर्तनातून दिसून येत होता. एकदा त्यांच्या काखेत आलेल्या गाठीस चटका देणाऱ्यास तप्त लाल सळईने चटका देताना वाईट वाटत होते, अशा प्रसंगी वल्लभभाई यांनी स्वतःकडे सळई घेऊन चटका दिला. अशा धिटाईतूनच ते पुढे शिक्षणात सुद्धा चमकले. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. बॅरिस्टर झाले. ख्यातनाम वकील म्हणून नाव कमावले.
        महात्मा गांधीजींच्या प्रभावामुळे सरदार वल्लभभाई  देशसेवेत रमू लागले. गुजरातमध्ये आलेल्या पुराच्या प्रसंगी त्यांनी लोकांना धीर दिला. पुढे नागपूरला सरकारच्या आवाजवी करासंबंधी आवाज उठविला. बार्डोलीच्या सत्याग्रहाच्या वेळी शेतकऱ्यांवर बसवलेला जाचक शेतसारा त्यांनी शेतकऱ्यांच्या सहकार्यातून मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांना लोकांनी 'सरदार' ही पदवी बहाल केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री झाले. संस्थानमंत्री म्हणून उत्कृष्ट प्रकारचे काम केले. संस्थानाचे विलीनीकरण करिता त्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग केले. या पोलादी पुरुषाने 15 डिसेंबर 1950 रोजी मुंबई येथे जगाचा निरोप घेतला.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

No comments:

Post a Comment

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...