🔴 नेताजी सुभाषचंद्र बोस.🔴
जन्म:- 23 जानेवारी 1897 कटक, ओडिसा
मृत्यू:- 18 ऑगस्ट 1945, सायगाव विमानतळावर अखेरचे दिसले.
नाव :- सुभाषचंद्र जानकीनाथ बोस.
बंगालचा बावनकशी हिरा म्हणून ज्याचा उल्लेख करावा असे सुभाषबाबू स्वातंत्र्यलढ्यात कायमच अग्रणी राहिले. इंग्लंडला जाऊन आयसीएस होऊन सुद्धा परकीय सत्तेच्या गुलामगिरीत नोकरी करणार नाही व परकीय सत्तेचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही. या तत्त्वांसाठी त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या छत्राखाली स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. कलकत्ता महानगर पालिकेत निवडून आले. अधिकारी बनले. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. पुढे राष्ट्रीय सभेच्या निमित्ताने पंडित नेहरूंच्या सोबत भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठेवून काम करावे असे ठरवले. त्यातून ते दोन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले. पुढे मतभेदातून त्यांनी पुरोगामी दलाची स्थापना केली.
सरकारला ऐन वेळी हातावर तुरी देऊन निसटण्यात त्यांचा कोणीही हात धरु शकत नसे. 'आझाद हिंद सेना' त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात गाजवली. ब्रिटिशांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" असे म्हणत, त्यांनी इंग्रजांविरुद्ध दंड थोपटले. पुढे प्रत्येक लढ्याला तयार झाले. व त्यात यशस्वी झाले. सुभाषबाबूंची 'जय हिंद' ही सिंहगर्जना भारताच्या कानाकोपऱ्यात आजही देश प्रेमाचे प्रतीक बनली आहे.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

No comments:
Post a Comment