" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

पंडित जवाहरलाल नेहरू


           🔴 पंडित जवाहरलाल नेहरू 🔴



जन्म:- 14 नोव्हेंबर 1889 अलाहाबाद.
मृत्यू:- 27 मे 1964
नाव :- पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू.
           
             महात्मा गांधीजींच्या विचारधारेशी सावलीप्रमाणे उभे राहणारे पंडित नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देशाच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात त्यांनी लखनऊला लाठीमार सहन केला. ते आपल्या निश्चयाला चिकटून राहिले. त्यांच्या निस्सीम देशभक्तीमुळे ते 19 29 च्या काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि ते स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान झाले. सतरा वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी स्वतःला त्या कार्यात झोकून दिले होते.
        देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन 'पंचशील' ही लाख मोलाची देणगी समस्त जगाला दिली. 'शांतिदूत' ही पदवी बहाल करून या राष्ट्रपुरूषाला सन्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करत. लहान मुले त्यांना खूप आवडत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत ही जाणीव त्यांच्या ठायी होती. 27मे 1964 रोजी या थोर पुरुषाने आपणा सर्वांचा निरोप घेतला.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯        
           

No comments:

Post a Comment

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...