" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

ना. गोपाळ कृष्ण गोखले

    
          🔴  ना. गोपाळ कृष्ण गोखले 🔴


जन्म :-9मे 1866 कोथळूक ,रत्नागिरी.
मृत्यू:- 19 डिसेंबर 1915
नाव :- गोपाळ कृष्ण गोखले.
        
            भारतीय स्वातंत्र्ययुद्धात ज्यांनी आयुष्यभर कष्ट सोसले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, अशा महात्म्यात शोभून दिसणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे रत्नागिरी जिल्ह्यातील एका खेडेगावात जन्माला आले. त्यांचे बालपण अतिशय खडतर कष्टमय परिस्थितीत गेले, परंतु कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी पदवी मिळवली. देशसेवेने झपाटून गेलेले गोखले पुण्यात जाऊन न्यू इंग्लिश स्कूलच्या मंडळींस मिळाले. त्यांच्यावर आगरकर, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव पडला. ते शाळा-कॉलेजात इंग्रजी, गणित, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास हे विषय अतिशय आवडीने शिकवीत. पुढे न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्यत्व पत्करून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांचा सूक्ष्म अभ्यास केला .
       गोखल्यांनी राजकीय जीवनात सार्वजनिक सभेचे, काँग्रेस अधिवेशनाचे सरचिटणीस म्हणून उत्तम प्रकारे काम केले. पुढे डेक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी भारतीय स्थितीचे अभ्यासपूर्ण वर्णन केले. त्यांच्या अभ्यासाची जाणीव इंग्रजांना सुद्धा होती. त्यामुळेच गोखल्यांनी भारतीयांची जेवढी दाद मिळवली तेवढीच दा इंग्रज सरकार सुद्धा देत होते. समाज सुधारणा करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. अस्पृश्यतानिवारण, स्त्रियांचे प्रश्न ,शैक्षणिक प्रश्न, औद्योगिक प्रश्न, सामाजिक प्रश्न अशा प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या उत्कृष्ट कामाच्या पद्धतीमुळे देशाची पावले प्रगतीपथावर पडू लागली. त्यांचा गौरव करण्यास शब्द अपुरे पडतात.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
      

No comments:

Post a Comment

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...