" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

Friday, 12 June 2020

कल्हई म्हणजे काय? 🤔

     
                      📣 कल्हई म्हणजे काय ? 🤔🤔

 

कल्हई म्हणजे काय?
         
         स्वयंपाक घरातल्या जुन्या तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्याची जागा जशी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यानी घेतली,  तसतशी कल्हई आणि कल्हईवाले दुर्मिळ होत गेले. तांब्या-पितळेची भांडी चकचकित करून त्यावर कथिल धातु चा थर लावण्याचे काम हे कल्हईवाले करत. गल्लीगल्लीतून फिरून  कल्हईवाला अशी आरोळी ठोकल्यानंतर एखाद्या झाडाखाली  

कल्हईवाला त्याचे दुकान थाटत असे.
तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा आम्लधर्मी पदार्थ बनवले असता, त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता निर्माण होते. काही वेळेस अन्नाची चव बिघडते तर काही वेळेस अन्नपदार्थाच्या रंगात बदल होतो. त्यातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. हे टाळावे म्हणून तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यांना आतून कल्हई केली जाते.

       जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केले जाते. त्यातील विस्तवावर भांडे आतल्या बाजूने तापवले जाते.  पांढऱ्या रंगाची नवसागराची ( अमोनियम क्लोराइड) भुकटी वापरून भांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ लख्ख केले जाते. हे करताना पांढरा, उग्र वासाचा धूर तयार होतो. भांडे गार होण्यापूर्वीच कथिल (टिन) धातूचा छोटा तुकडा भांड्यात टाकला जातो. कथील हा मऊ, लाकाकणारा, निळसर - पांढऱ्या रंगाचा उपयुक्त धातू आहे. तो पटकन वितळतो. अतिशय कौशल्याने  कल्हईवाला तो वितळलेला धातू पटकन भांड्यात सर्वत्र पसरवून त्याचा लेप देतो. भांडे थंड करण्यासाठी ते थंड पाण्यात टाकले जाते. कल्हई केलेल्या भांड्यात बनवलेले जेवण शरीरासाठी अपाय करत नाही, म्हणून दर काही महिन्यांनी तांब्या पितळेच्या भांड्यांना कलई करणे गरजेचे असते.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

1 comment:

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...