🔴 लोकमान्य टिळक 🔴
जन्म:- 23 जुलै 1856 चिखली, तालुका:- रत्नागिरी.
मृत्यू :-1 ऑगस्ट 1920 मुंबई.
नाव :- केशव गंगाधर टिळक. (बाळ)
भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं त्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते, कारण या थोर महात्म्यांनी तरुण वयातच समाज सुधारण्यासाठी व समाज ऐक्यासाठी जिद्दीने पावले उचलली. देशभक्तीच्या अलोट प्रेमापोटी स्वदेशाचा नारा देशभर पसरवला. समाज जागृतीसाठी लेखणी आवश्यक असल्याचे चाणाक्षपणे ओळखले आणि केसरी व मराठा या सारखी वृत्तपत्रे सुरु केलीत, तसेच समाज ऐक्यासाठी शिवजयंती व गणेश उत्सव हे सार्वजनिक उत्सव देखील सुरु केलेत. जहाल मतवादी यांचे लोकमान्य टिळक नेते बनले." स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" अशी सिंहगर्जना त्यांनी केली, आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. समाज तर सुधारला पाहिजेच पण प्रथम स्वातंत्र्य आवश्यक असे त्यांचे मत होते.
शिक्षणाची माणसाच्या आयुष्यात अतिशय निकडीची गरज असते आणि ते प्रत्येकाला मिळालेच पाहिजे, असे त्यांचे मत होते. यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल'ची स्थापना केली. स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना 'गीतारहस्य' नावाचा महान ग्रंथ लिहिला. मोडेल पण वाकणार नाही अशी त्यांची स्वराज्यासाठी मनापासून तयारी होती. समाज जागृती व हिंदू मुस्लिम ऐक्य यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे ध्येयवादी प्रयोग केलेत. इंग्रज सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाची अनेक वेळा ओळख करून दिली. टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आयुष्यभर लढलेत. आजही आपण त्यांचे नाव अभिमानाने घेतो. त्यांच्या अशा या लोकप्रिय कामांमुळे व समाज जागृतीमुळे लोकांनी त्यांना लोकमान्य अशी पदवी दिली.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

No comments:
Post a Comment