" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

मार्क झुकरबर्ग


       🅾️🅾️  वाढदिवस विशेष मार्क झुकरबर्ग 🅾️🅾️



फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्स ऍप चा मालक 'मार्क झुकरबर्ग यांचा वाढदिवस 


फेसबुकचा सह-संस्थापक मार्क झुकरबर्गचा आज 36वा वाढदिवस. आज याच मार्कमुळे आपण घरांमध्ये बसून एकमेकांशी कनेक्टेड आहोत. आज आपण मार्कच्या वाढदिवसानिमित्त त्याचा संपूर्ण प्रवास आणि त्याच्याविषयी माहित नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊया...


बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या उक्तीप्रमाणे कॉम्पुटर गेम खेळण्याच्या वयात मार्क गेम्स बनवण्यात मग्न असायचा. अवघ्या 12 वर्षांचा असताना मार्कने वडिलांच्या ऑफिससाठी मेसेजिंग प्रोग्राम तसेच शाळेच्या दिवसात एक म्युझिक अ‍ॅप डेव्हलप केले होते. मार्कचे कॉम्प्युटर प्रेम कॉलेजमध्येही कायम राहिले.


मार्कचा वेग पाहता त्याला एओएल व मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी नोकरीच्या ऑफर देऊ केल्या मात्र त्याने हॉवर्डला जाण्याचा निर्णय घेतला. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना मार्कला एक भन्नाट कल्पना सुचली. त्याने कॉलेजच्या मुलांना जोडण्यासाठी एक वेबसाईट तयार केली. संपूर्ण लोक एकत्र येतील अशी एक वेबसाईट तयार करण्याचा मार्कने विचार केला. पुढे जाऊन हाच विचार फेसबुकमध्ये परावर्तित झाला. 


सर्वात प्रथम 4 फेब्रूवारी 2004 मध्ये फेसबुक लाँच झाले. तेव्हा हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सॉफ्टवेअर (वेबसाईट) असणारे फेसबुक मेंबरशिप लिमिटेड होते.


आता हळू-हळू यासाठी पैशांची गरज जाणवायला लागली. मात्र आर्थिक समस्येपुढे मार्कने हार मानली नाही. मग त्याने 100 कुटुंबाकडून 85,000 डॉलर कर्ज म्हणून घेतले. पीटर थील यांनी फेसबुकमध्ये 5 लाख डॉलर गुंतवले. 


मग मार्कची वेबसाईट अपडेट व्हायला लागली. त्यातून शहरातील इतर कॉलेजांना देखील जोडण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झालेले हे सॉफ्टवेअर पुढे जाऊन जगावर आपला प्रभाव टाकू शकेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र मार्क आणि त्यांच्या मित्रांच्या प्रयत्नांना घवघवीत यश मिळाले.


आता फेसबुकची लोकप्रियता वाढायला लागली होती. हाच विचार करून मार्कने भारतासारख्या मोठ्या मार्केटमध्ये उतरायचे ठरविले. मात्र त्यावेळी भारतात 'ऑर्कूट' ची एक वेगळीच हवा होती. 'ऑर्कूट' ला टक्कर द्यायचा कुणी विचार करेल असे वाटत नव्हते.


मात्र सर्व बंधनांना झुगारून मार्के स्वतःच एक वेगळा मार्ग निवडला आणि तो यशस्वी करून दाखविला. फेसबुकचे यश पाहून तेव्हा याहूसह 11 कंपन्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्क यांनी सर्वच ऑफर झुगारल्या. मार्क म्हणतो, “प्रश्न हा नाही की आपण लोकांच्या बाबत काय जाणू इच्छितो, प्रश्न हा आहे की लोक आपल्याबद्दल काय सांगू इच्छितात.”


🎯 विशेष आणि माहित नसलेल्या बाबी : 

● मार्कचा जन्म 14 मे 1984 ला अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील डाब्स फेरी येथे झाला.


● त्याचे पुर्ण नाव मार्क इलिएट झुकरबर्ग असेआहे. त्याचे आई-वडिल दोघेही सायकेट्रिस्ट आहेत. 


● 2010 मध्ये टाइम मॅगझिनने मार्कला पर्सन ऑफ द इयर घोषित केले


● मार्कने इन्स्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या कंपनीचे अधिग्रहण केले. 


● मार्कने 2013 मध्ये एक बिलियन डॉलर्स चॅरिटीला दान केले होते.


● मार्क नेहमी सामान्य ग्रे टी शर्ट किंवा हुड व जीन्समध्ये दिसून येतात. 


● फेसबुकचा लोगो निळ्या रंगाचा आहे कारण मार्कला लाल-हिरव्या रंगाचा रंगांधळेपणा आहे.


● फेसबुकवर मार्क झुकेरबर्गला कुणीही ब्लॉक करू शकत नाही.


● फेसबुकच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक 5 सेंकदाला 5 नवीन लोक फेसबुक अकाउंट बनवतात.


No comments:

Post a Comment

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...