" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

Sunday, 30 August 2020

Useful Short keys for Computer

 📝Know More About Your Computer

Many Useful ShortKeys📝


🔹Ctrl+A - Select All

🔹Ctrl+B - Bold

🔹Ctrl+C - Copy 

🔹Ctrl+D - Fill Down

🔹Ctrl+F - Find

🔹Ctrl+G - Goto

🔹Ctrl+H - Replace

🔹Ctrl+I - Italic

🔹Ctrl+K - Insert Hyperlink

🔹Ctrl+N - New Workbook

🔹Ctrl+O - Open

🔹Ctrl+P - Print

🔹Ctrl+R - Fill Right

🔹Ctrl+S - Save

🔹Ctrl+U - Underline

🔹Ctrl+V - Paste

🔹Ctrl W - Close

🔹Ctrl+X - Cut

🔹Ctrl+Y - Repeat

🔹Ctrl+Z - Undo

🔹F1 - Help

🔹F2 - Edit

🔹F3 - Paste Name

🔹F4 - Repeat last action

🔹F4 - While typing a formula, switch between absolute/relative refs

🔹F5 - Goto

🔹F6 - Next Pane

🔹F7 - Spell check

🔹F8 - Extend mode

🔹F9 - Recalculate all workbooks

🔹F10 - Activate Menu bar

🔹F11 - New Chart

🔹F12 - Save As

🔹Ctrl+: - Insert Current Time

🔹Ctrl+; - Insert Current Date

🔹Ctrl+" - Copy Value from Cell Above

🔹Ctrl+’ - Copy Formula from Cell Above

🔹Shift - Hold down shift for additional functions in Excel’s menu

🔹Shift+F1 - What’s This?

🔹Shift+F2 - Edit cell comment

🔹Shift+F3 - Paste function into formula

🔹Shift+F4 - Find Next

🔹Shift+F5 - Find

🔹Shift+F6 - Previous Pane

🔹Shift+F8 - Add to selection

🔹Shift+F9 - Calculate active worksheet

🔹Shift+F10 - Display shortcut menu

🔹Shift+F11 - New worksheet

🔹Ctrl+F3 - Define name

🔹Ctrl+F4 - Close

🔹Ctrl+F5 - XL, Restore window size

🔹Ctrl+F6 - Next workbook window

🔹Shift+Ctrl+F6 - Previous workbook window

🔹Ctrl+F7 - Move window

🔹Ctrl+F8 - Resize window

🔹Ctrl+F9 - Minimize workbook

🔹Ctrl+F10 - Maximize or restore window

🔹Ctrl+F11 - Inset 4.0 Macro sheet

🔹Ctrl+F1 - File Open

🔹Alt+F1 - Insert Chart

🔹Alt+F2 - Save As

🔹Alt+F4 - Exit

🔹Alt+Down arrow - Display AutoComplete list

🔹Alt+’ - Format Style dialog box

🔹Ctrl+Shift+~ - General format

🔹Ctrl+Shift+! - Comma format

🔹Ctrl+Shift+@ - Time format

🔹Ctrl+Shift+# - Date format

🔹Ctrl+Shift+$ - Currency format

🔹Ctrl+Shift+% - Percent format

🔹Ctrl+Shift+^ - Exponential format

🔹Ctrl+Shift+& - Place outline border around selected cells

🔹Ctrl+Shift+_ - Remove outline border

🔹Ctrl+Shift+* - Select current region

🔹Ctrl++ - Insert

🔹Ctrl+- - Delete

🔹Ctrl+1 - Format cells dialog box

🔹Ctrl+2 - Bold

🔹Ctrl+3 - Italic

🔹Ctrl+4 - Underline

🔹Ctrl+5 - Strikethrough

Ctrl+6 - Show/Hide objects

🔹Ctrl+7 - Show/Hide Standard toolbar

🔹Ctrl+8 - Toggle Outline symbols

🔹Ctrl+9 - Hide rows

🔹Ctrl+0 - Hide columns

🔹Ctrl+Shift+( - Unhide rows

Ctrl+Shift+) - Unhide columns

🔹Alt or F10 - Activate the menu

🔹Ctrl+Tab - In toolbar: next toolbar

🔹Shift+Ctrl+Tab - In toolbar: previous toolbar

🔹Ctrl+Tab - In a workbook: activate next workbook 

🔹Shift+Ctrl+Tab - In a workbook: activate previous workbook

Tab - Next tool

🔹Shift+Tab - Previous tool

Enter - Do the command

🔹Shift+Ctrl+F - Font Drop down List

🔹Shift+Ctrl+F+F - Font tab of Format Cell Dialog box

🔹Shift+Ctrl+P - Point size Drop down List

🔹Ctrl + E - Align center

🔹Ctrl + J - justify

🔹Ctrl + L - align  

🔹Ctrl + R - align right

🔹Alt + Tab - switch applications

🔹Windows + P - Project screen

🔹Windows + E - open file explorer

🔹Windows + D - go to desktop

🔹Windows + M - minimize all windows

🔹Windows + S - search```


Enjoy and share ❤️

Saturday, 29 August 2020

ATM मधून रक्कम न मिळणे ???

🏦 बँक एटीएम मधून खात्यातून रक्कम कट होऊन रोख रक्कम न मिळाल्यास काय करावे? 

🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔


🔴👉 सर्व ATM धारकासाठी महत्वाची सूचना:- उदा.  दिपक एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. दिपक एटीएममधून 10 हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी कार्ड स्वॅप करून पिन टाकला आणि 10 हजाराची नोंद केली. त्यांच्या अकाऊंटमधून पैसे कट झाले, मात्र एटीएममधून पैसेच बाहेर आले नाही. त्यानंतर दिपक संबंधीत बँकेत गेला आणि आरबीआयच्या एटीएम ट्रान्झॅक्शनच्या गाईडलाईन प्रमाणे त्याने प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्याला 10,800 रुपये परत केले. म्हणजेच 800 रुपये जास्त.


 🔴👉जर अशाच परिस्थितीत तुम्हीही अडकलात तर बँकेकडून कशा प्रकारे भरपाई मिळवाल ?  माहित नाही ना.. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, 8 सोप्या स्टेप्समध्ये...


🤹 🔴 सर्वात पहिले आरबीआय एटीएम ट्रान्झॅक्शन गाईडलाईन समजून घेऊयात 


 1⃣आरबीआय गाईडलाईन प्रमाणे, अकाऊंटमधून पैसे कट झाले मात्र एटीएममधून तुम्हाला ते मिळाले नाहीत, अशा प्रसंगी 7 दिवसांच्या आत (कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटेलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत बँक 100 रुपये प्रति दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल.


2⃣ ट्रांझॅक्शनच्या 30 दिवसांच्या आत तक्रार केल्यावरसुध्दा एटीएम यूजरला बँकेकडून भरपाई घेण्याचा हक्क आहे. यानंतर तक्रार केल्यानंतर बँकेला भरपाई देण्यास बंधन नसते.   

                                                                              🔔स्टेप 1🔔

एटीएम स्लीप अथवा अकाऊंट स्टेटमेंटसंबंधीत बँकेच्या शाखेत तक्रार करावी.

एटीएम मशीनमध्येच संबंधीत शाखा आणि मॅनेजरचे नाव आणि नंबर लिहिलेला असतो. 

                                                       

🔔 स्टेप 2 🔔

ट्रॕन्झेक्शनच्या 30 दिवसांच्या आतच तुम्हाला तक्रार करायची आहे. तुमच्या एटीएम कार्डाची संपूर्ण माहिती, अकाऊंट नंबर, एटीएम आयडी अथवा लोकेशन आणि ट्रॕन्झेक्शनची तारीख, वेळ इत्यादी माहिती बँकेला देणे आवश्यक आहे. 


🔔 स्टेप 3🔔

ब्रँच मॅनेजरकडून बँकेचा स्टॅम्प आणि स्वाक्षरीसोबत तक्रारीची  पोचपावती नक्की घ्या. ही प्रत 100 रुपये प्रती दिवस या भरपाईसाठी खुप महत्त्वाची आहे.

                                                                                                                                       

🔔 स्टेप 4 🔔

तक्रारीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत पैसे न आल्यास एनेक्जर - 5फॉर्म

(http://rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/170811AN_5.pdf) हा फॉर्म भरून मॅनेजरला द्या.

ज्या बँकेत तुमचे अकाऊंट आहे तेथेच हा फॉर्म जमा करायचा आहे.


🔔  स्टेप 5 🔔

बँक एनेक्जर-5 फॉर्म भरण्याच्या तारखेपासूनच पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येईल पर्यंत प्रति दिवस 100 रुपये या प्रमाणे भरपाई देईल. अकाऊंटमधून कापलेल्या पैशांसोबतच भरपाईची रक्कमसुध्दा तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येते.             


🔔 स्टेप 6 🔔


उदाहरणार्थ, तुमच्या अकाऊंटमधून 10 हजार रुपये कापले गेले, मात्र ते एटीएममधून बाहेर आले नाही. जर तुम्ही 5 एप्रिलला एनेक्जर-5 भरला आहे आणि पैसे 20 एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये जमा झाले तर तुमच्या खात्यात 11500 रुपये येतील. यामध्ये 15 दिवसांचे 1500 रुपयांची भरपाई देण्यात येईल.  

                                                                             🔔 स्टेप 7 🔔

जर बँक पेनल्टी देत नसेल तर आरबीआय च्या बँकींग ओम्बड्समॅनला

https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm वर ऑनलाईन तक्रार करू शकता.

फोनवरूनसुध्दा तक्रार करू शकता. ओम्बड्समॅनचे नाव आणि फोन नंबर जाणून घेण्यासाठी

https://www.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=164 वर जा...


🔔 स्टेप 8 🔔

- तक्रारीच्या आधारे आरबीआय ओम्बड्समॅन संबंधीत बँकेला उत्तर मागेल.

- बँकेकडून देण्यात आलेले उत्तर आणि सपोर्टींग पुरावा तपासला जाईल.

- बँकेची चूक असल्यास बँकेला भरपाई देण्यास आरबीआय सांगेल.


बऱ्याच लोकांना ही माहिती नसते. कृपया इतर ग्रुप्सवर देखील शेअर करा.🙏🙏🙏🙏🙏

औषधी तुळस

 🌿 आरोग्यदायी तुळस 🌿



तुळस एक खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्व देखील प्राप्त आहे तसेच तुळशी एक सुगंधीत वनस्पती देखील आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे झाड असते. तुळशीची पूजा देखील केली जाते. परंतु ज्याप्रमाणे तुळशी धार्मिक, आरोग्य आणि औषधीसाठी उपयुक्त त्याचप्रमाणे तुळशी आपल्या सौदर्यासाठी देखील फायदेशीर आहे. आपण आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी तुळशीची पाने वापरू शकता. 


अशा गुणकारी तुळशीचे फायदे आपण जाणून घेऊ.


🌿 त्वचा नितळ आणि चमकदार होते 🌿

जर तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप असेल तर तुम्ही तुमची त्वचा नेहमी स्वच्छ ठेऊ शकता, कारण तुळशीच्या पानांमध्ये तुमच्या त्वचेला मुळापासून स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. जर तुमची त्वचा धुळ, माती आणि प्रदूषणामुळे निस्तेज दिसत असेल तर तुळशीच्या पानांनी निस्तेजपणा दूर होईल. विशेष  म्हणजे तुळस एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत. उलट यामुळे त्वचा निर्जंतुक होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला तुळशीची पाने घ्यावी लागतील आणि त्यांना वाटून त्यांची पेस्ट करावी लागेल. ही पेस्ट त्वचेवर लावावी आणि त्वचा १५ मिनिटांनी स्वच्छ धुवावी. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि नितळ दिसेल.


🌿 चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कमी 🌿


चेहऱ्यावरील पिंपल्स ही सौंदर्यात बाधा आणणारी समस्या आहे. आजकाल या समस्येला प्रत्येक व्यक्ती सामोरे जातो. त्यातल्या त्यात तुमची त्वचा जर तेल अथवा अती संवेदनशील असेल तर पिंपल्स दूर करणं फार कठीण होते. मात्र ही चिंता चुटकीसरशी दूर होऊ शकते कारण आता तुळशीच्या पानांच्या फेसपॅकने तुमची ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट, चंदन पावडर आणि गुलाबाचं पाणी एकत्रित करा आणि फेसपॅक तयार करावा. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक वापरून तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करू शकतात.


🌿 चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी करतात.🌿


आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरूणपणीच चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र यावर देखील तुळशी फायदेशीर आहे. यासाठी रोज तुळशीच पाने गरम पाण्यास उकळून त्यांचा रस दररोज घेतल्यास त्वचा डिटॉक्स होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा टिकून राहतो, तसेच सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी तुळशीचा काढा पिल्याने तुमचे आरोग्य देखील निरोगी आणि उत्तम राहते.


🌿 केसांच्या वाढीस फायदेशीर 🌿


जर तुमचे केस गळत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. बरेच लोक केसांची फोलिकल्स, कोरडे केस, केस फाटणे अशा अनेक समस्यांना सामोरे जात असतात. जर केसांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल आणि लांब केस मिळवायचे असतील तर तुम्ही तुळशीच्या पानांच्या साहाय्याने केसांचे आरोग्य टिकवू शकता. यासाठी भांड्यात तुळशीच्या पानांचा रस घ्यावा आणि या रसात काही थेंब लिंबाचा रस घालावा. हा रस केसांच्या मुळांवर लावावा आणि २० ते ३० मिनिटांनी केस स्वच्छ धुवावेत. असे आठवड्यातून एकदा केल्याने आपल्या केसांचे आरोग्य सुधारेल.


🌿 तोंडाची दुर्गंधी दूर होते.🌿


तुळशीची पाने तोंडाची दुर्गंधी दूर करतात. तुळशीची पाने नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचं काम करतात. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्यावी, त्यांनतर ते पाणी थंड करून त्याची चूळ भरावी. असे केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. तसेच दररोज सकाळी उठल्यानंतर तुळशीची पाने चघळल्याने तुमचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.

Wednesday, 26 August 2020

सा.ज्ञा.चा.क्र.10

          


👉👉    चाचणी क्र 10 सोडवा     👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

Tuesday, 25 August 2020

सा.ज्ञा.चा.क्र.09

         


👉👉    चाचणी क्र 09 सोडवा     👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

सा.ज्ञा.चा.क्र.08

        


👉👉    चाचणी क्र 08 सोडवा     👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

Sunday, 23 August 2020

सा.ज्ञा.चा.क्र.07

       


👉👉    चाचणी क्र 07 सोडवा     👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

Saturday, 22 August 2020

सा.ज्ञा.चा.क्र.06

      


👉👉    चाचणी क्र 6 सोडवा     👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

Friday, 21 August 2020

सा.ज्ञा. चा.क्र.05

     


👉👉    चाचणी क्र 5 सोडवा     👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

Wednesday, 19 August 2020

सा.ज्ञा.चा.क्र.04

    


👉👉    चाचणी क्र 4 सोडवा     👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

Tuesday, 18 August 2020

सा.ज्ञा.चाचणी 03

   


👉👉    चाचणी क्र 3 सोडवा     👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

Monday, 17 August 2020

सा.ज्ञा.चाचणी क्र 02

  


👉👉    चाचणी सोडवा     👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

Sunday, 16 August 2020

सा ज्ञान चाचणी क्र 01

 


👉👉    चाचणी सोडावा      👈👈

☝️वरील चाचणी सोडवा नावाला क्लिक करा. 

Friday, 14 August 2020

जन्माष्टमी - श्रीकृष्णजन्मोत्सव

              🙏 कृष्णम् वंदे जगत गुरुम्  🙏

      
                 🙏🙏जय श्री कृष्णा🙏🙏
       
       हिंदू धर्मानुसार भगवान श्री विष्णूचे 10 अवतार मानण्यात येतात त्यापैकी भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णूंचे 8 वा अवतार आहेत असे मानतात. त्यांना कन्हैया, श्याम, गोपाल, केशव, द्वारकेश किंवा द्वारकाधीश, वासुदेव,गोविंद इत्यादी नावांनीही ओळखले जाते. प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात गो म्हणजे इंद्रिये आणि विंद म्हणजे विजय मिळविणारा म्हणजेच ज्याने आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा , विजय मिळवला आहे असा भगवान परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण . श्रीकृष्ण निश्चम कर्मयोगी, एक परिपूर्ण तत्वज्ञ, स्थित ज्ञान आणि दैवी संपत्तीने सुसज्जित एक महान विभूती होते.. त्यांचा जन्म द्वापरयुगात  श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला, बुधवारी, रोहिणी नक्षत्र आणि वृषभातील चंद्र असतांना झाला होता. . त्यांना या काळातील सर्वोत्कृष्ट पुरुष, युगपुरुष किंवा युगावतारी म्हणून स्थान देण्यात आले आहे. श्रीकृष्णाचे चरित्र, कृष्णाचे समकालीन महर्षि वेदव्यास यांनी रचलेल्या श्रीमद्भागवत आणि महाभारतात विस्तृतपणे लिहिले आहे. श्रीमतभगवद्गीता भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील संवाद आहे, जो आजही जगभरात लोकप्रिय आहे.त्यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्तमात्र करत संपूर्ण जगाला निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोगाचे महत्व सांगितलेले आहे. या कार्यासाठी जगतगुरु श्रीकृष्णाला पुरस्कृत केले जाते. भगवान श्रीकृष्ण वासुदेव आणि देवकी यांचे 8 वे अपत्य होते. त्याचा जन्म मथुरा येथे त्यांचा मामा राजा कंस याच्या तुरूंगात झाला होता.भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या अवतारात अनेक लीला केल्या होत्या त्यातीलच एक लीला म्हणजे श्रीकृष्णाचे मथुरेच्या तुरुंगातून गोकुळात कोणालाही न कळता पोहचणे.भगवान श्रीकृष्णाचा जन्म जरी मथुरेत झाला होता पण बालपण मात्र गोकुळात राजा नंद व माता यशोदा यांचा छायेत गेले. बालपणात त्यांना मारण्यासाठी कंसाने अनेक दानवी शक्तींना गोकुळात पाठवले पण ते या कामात कधीच यशस्वी होऊ शकले नाहीत. भगवान श्रीकृष्णांनी या बालवयात अनेक महान कामे केली जी कोणत्याही सामान्य माणसाच्या अवाक्याबाहेरची होती. त्यांनी आपल्या अत्याचारी व क्रूर मामास ठार केले आणि त्याच्या कैदेतून आपल्या आई- वडिलांची व साऱ्या मथुरा निवासींची सुटका केली. 

         पुढे भगवान श्रीकृष्णांनी सौराष्ट्रात समुद्रतिरी द्वारका नगरीची स्थापना केली आणि तेथे आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.उल्लेखनीय आहे की कृष्णाला 8 बायका अर्थात रुक्मिणी, जांबावंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रबिंदा, सत्य, भद्र आणि लक्ष्मण ह्या होत्या. ..पुढे महाभारताच्या युद्धप्रसंगी पांडवांची बाजू घेऊन त्यांच्या विजयास हातभार लावला व अधर्मचा नाश करून धर्माचे राज्य स्थापन केले.  महाभारताच्या युद्धामध्ये त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका साकारली आणि भगवद्गीतेचे ज्ञान दिले जे त्यांच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट रचना मानली जाते. महाभारताच्या युद्धानंतर 36 वर्षांनी म्हणजेच वयाच्या 124 व्या वर्षी गांधारीच्या शापाने एका शिकाऱ्याच्या हातून बाण लागल्याने भगवान श्री कृष्णाने आपल्या लीला संपविल्यात. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Thursday, 6 August 2020

9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस

                     🔴 9 ऑगस्ट 🔴
            

           🎯  विश्व आदिवासी दिवस 🎯



9 ऑगस्ट हा दिवस प्रामुख्याने विश्व आदिवासी दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो.एखाद्या दिवसाला जागतिक दिवस म्हणून साजरा करण्यासाठी सर्वात आधी त्या दिवसाला संयुक्त राष्ट्रांच्या परवानगीची आवश्यकता असते आणि त्या दिवसाचे तेवढे वैश्विक महत्व देखील अधोरेखित करण्याजोगे असायला हवे.

आदिवासी म्हटलं म्हणजे ..वनांत राहणारा ,दऱ्या खोऱ्यात फिरणारा, शिकार करणारा, झाडाची पाने, कंदमुळे, फळे खाणारा अर्धवस्त्र अवस्थेत भटके जीवन जगणारा समुदाय अशी  ओळख करून देण्यात येते...आणि काही अंशी ते खरं देखील आहे....कारण आदिवासी समुदाय हा मुख्यतः निसर्गाच्या सानिध्यात राहणारा, निसर्गाशी एकरूप राहणारा, निसर्गातच देवत्व शोधणारा ,शांततामय जीवन जगणारा व अतिशय कमी गरजा असलेला समुदाय आहे.

आदिवासी शब्दाची फोड केल्यास असे लक्षात येते की आदिवासी = आदी + वासी ,यातील आदी म्हणजे खूप आधीचा,पुरातन, खूप जुना आणि वासी म्हणजेच वास करणारा,राहणारा अर्थात रहिवासी.... म्हणजेच जे या भूमीवर सर्वात आधीपासूनचे रहिवास करीत आहेत..अर्थात या भूमीचे खरे मालक आहेत ,मूलनिवासी आहेत. पण याच भौगोलिक अलिप्ततेमुळे आज आदिवासीं बांधवापर्यंत विकासगंगा पोहचली नाही. त्यामुळे आदिवासींमध्ये शिक्षण, आरोग्य, अज्ञान, गरिबी व अंधश्रद्धा या सारखे अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्न निर्माण झालेले दिसतात.


अतिशय बिकट परिस्थितीतही आदिवासींनी कधी निसर्गाची हेंडसांड केली नाही तर पर्यायाने त्यांनी निसर्गाची जोपासनाच केली व आपली वादन, गायन , सामूहिक नृत्य,केशभूषा ,वेषभूषा यातून आपली खास ओळख टिकवत आदिवासी संस्कृतीची जोपासना केली.

प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित रहावी ,प्रत्येक देशाच्या सर्वभौमत्वाचे रक्षण व्हावे आणि  'live and let live' " जागा आणि जगू द्या" या म्हणी प्रमाणे प्रत्येक व्यक्तीस म्हणजे मानव प्राण्यास त्याच्या इच्छेनुसार समाजीकतेचे भान राखत जगण्याचा व त्याची संस्कृती,प्रथा, परंपरा जोपासण्याचा अधिकार आहे..हे प्रथमतः मान्य करण्यात आले आणि त्याच्या रक्षणार्थ संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली.
पण जागतिकीकरण, व्यापारीकरण ,औद्योगिकरण, शहरीकारण होत गेलं आणि पर्यायाने जंगले , वन संपत्तीचा खूपच ऱ्हास झाला आणि त्या वनांत राहणारा आदिवासी समुदाय अडचणीत आला. म्हणून UNO ने लुप्तप्राय होत जाणाऱ्या आदिवासी संस्कृतीची जोपासना व्हावी व आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व टिकवून राहावे यासाठी 1993 च्या आमसभेत एक ठराव मंजूर करून 9 ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून पाळण्याचे आदेशीत केले.. आणि त्या दिवसापासून संपूर्ण जगात 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 
      आज भारतात 461 येवढ्या प्रमुख आदिवासी जमातींची नोंद झाली आहे.भारत सरकारने आपल्या देशातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक आरक्षणाची तरतूद करून आदिवासींच्या विकासास हातभार लावला आहे.त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात आदिवासी बांधव उच्च पदांवर विराजमान होऊन देशसेवा करतांना आढळतात.


स्वातंत्र्योत्तर काळातच नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळातही आदिवासींनी आपल्या हक्कासाठी व अन्यायाविरुद्ध इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवून लढा दिलेला आढळतो.त्यात प्रामुख्याने आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक,तंट्या भिल,बिरसा मुंडा, भागोजी नाईक,खाज्या नाईक इ आदिवासी क्रांतिकारकांचा नामोभिलेख करणे क्रमप्राप्त ठरेल..
        जेथे एकीकडे साऱ्या जगात कोविड19 च्या महामारीने थैमान घातले आहे तेथे मात्र आदिवासी बहुल भागात त्याच्या प्रसारास बऱ्यापैकी प्रतिबंध बसलेला आढळतो याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासीं मध्ये निसर्गताच आढळून येणारी प्रतिकार शक्ती.त्यांचं कष्टमय जीवन आणि निसर्गास अनुरूप जीवन शैली. आदिवासींना आपला विकास साधायचा असेल तर त्यांनी शिक्षणाची कास धरून विज्ञानाच्या साहय्याने आपली संस्कृती टिकवत जगाकडे सकारात्मक दृटीकोणातून बघणे आवश्यक आहे.......
        💪💪जय आदिवासी,  जय हिंद💪💪

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...