1.ससा नि कासव
एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे चाली भो. मंग दोन्हीस्मा दौडानी शर्यत लागस.समोरना पिप्पयना झाडले जो पहीले टीपी तो शर्यत जिकी असं ठरणं.
1.ससा नि कासव
एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे चाली भो. मंग दोन्हीस्मा दौडानी शर्यत लागस.समोरना पिप्पयना झाडले जो पहीले टीपी तो शर्यत जिकी असं ठरणं.
👥प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येईल 👥
आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता.
यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा *शालार्थ ID.*(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)
यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा.आणि पगार पञक पहा..
1) https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp या वेबसाईटला जा.
2) लॉग इन पेजवर जाऊन Username म्हणून तुमचा *शालार्थ ID* टाका.
तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.
3) लॉग इन केल्यानंतर Old password ifms123 हा टाका.
👉New password बनवा👈
(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).
तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.
5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा.
6) एक पगार पञक काढुन पहा.
🙏🙏🙏🙏🙏
**************************
📙 ओळख सण -उत्सवांची 📗
👥 मकर संक्रांती 👥
आपला देश साऱ्या जगात प्रामुख्याने उत्सव प्रिय देश म्हणून ओळखला जातो.असा एकही महिना नाही की त्यात एखादा हिंदू सण येत नाही. हिंदू धर्मात विविध सण, उत्सव यांना फार मोठे धार्मिक महत्व असते आणि प्रत्येक हिंदू तो मोठ्या आत्मीयतेने व उत्सवाने साजरा करतो,अशाच अनेक प्रमुख सणांपैकी मकर संक्रांत हा देखील एक महत्वाचा सण आहे.
मकरसंक्रांत हा सण दरवर्षी साधारणतः जानेवारी महिन्याच्या 14 तारखेस येतो.पण ज्या वर्षी लीप वर्ष असते, त्या वर्षी मात्र अपवादाने जानेवारीच्या 15 तारखेस हा सण साजरा करतात. हिंदू परंपरेनुसार या दिवशी सूर्य त्याचे दक्षिणायन संपवून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण सुरू होते.भारत हा भौगोलिक दृष्ट्या उत्तर गोलार्धात येतो आणि मकरवृत्त हे दक्षिण गोलार्धात येते,त्यामुळे या काळात सूर्य किरणे भारतीय उपखंडात तिरपी पडतात व त्यामुळे भारतात या काळात कडाक्याच्या थंडीचा अनुभव येतो.उत्तर भारतात तर काही ठिकाणी हिमवर्षाव देखील होतो.म्हणून मानवी शरीराला थंडी पासून बचाव व्हावा यासाठी गूळ व तीळ यांचे सेवन करून आपले आरोग्य टिकवणे गरजेचे असते.म्हणूनच आपण सर्व जण तीळ गूळ वाटून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो.
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावाने साजरा करतात. तामिळनाडूत याला पोंगल म्हणतात,तर गुजरातमध्ये उतारायन म्हणून जाणतात.भारताव्यतिरिक्त श्रीलंका, नेपाळ, म्यानमार,बंगलादेश येथे देखील मोठ्या उत्साहात मकर संक्रांती साजरी करतात. हा सण काही ठिकाणी 3 दिवस तर काही ठिकाणी 4 दिवस साजरा करतात. संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी तर संक्रांतीनंतरचा दिवस कर म्हणून साजरा करतात. संक्रांतीच्या दिवशी घरात गोडधोड अन्न बनवतात. एकमेकांना "तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला" म्हणून शुभेच्छा देतात.आपपसातले पूर्वीचे वैर विसरून मैत्री व एकोप्याचा संदेश देतात.वर्षभरातील सर्व रुसवे फुगवे विसरून नात्यात गोडवा आणणारा सण म्हणजे मकर संक्रांत होय.
गुजरात राज्यात या दिवशी पतंग उडवतात. तेथे मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याच्या स्पर्धा भरविण्यात येतात. हा सण 'पतंगमहोत्सव' म्हणून साजरा करतात.उत्तर भारतात या दिवशी पवित्र नदीत स्नान करून वर्षभरात केलेल्या वाईट कामापासून मुक्ती मिळवतात.
असा हा विविधतेत एकता असणारा अस्सल भारतीय सण आहे.
चला तर मग तुम्हांसही "तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला", "आमचं तीळ गूळ सांडू नका,आमच्याशी भांडू नका".संक्रांती च्या खूप खूप शुभेच्छा.
👥 मकर संक्रांत प्रश्नमंजुषा 👥
प्रश्न :-15 गुण:- 30 निकाल तात्काळ
त्यासाठी खालील Click नावाला tuch करा.
👇👇
👉👉 Click click 👈👈
🙏राजमाता जिजाऊसाहेब🙏
जिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मॉंसाहेब,वीरमाता) (१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४)
जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी देवगिरी येथे विवाह झाला.
👊भोसले व जाधवांचे वैर👊
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली. पहिले जाधवांचे, त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
[१]या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.
[२] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
अपत्ये👥👥
जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
जगाला दिशा देणारी जगत्जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सन 1635 ला पुण्यात लाल महाल बांधून पुणे मुक्कामी राहू लागल्या, आदिलशाहीचा सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी याने पुणे उजाड केले होते. पुण्याच्या याच जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर तुटलेली चप्पल बांधून जो ही जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिलेली भूमी अवघ्या पाच वर्षे वयाच्या शिवबांच्या हातात सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून ती भूमी नांगरली. सोबत रायनाक या दलिताचा मुलगा, रामोश्याचा, मातंगाचा आणि लोहाराचा एक अश्या पाच बालकांनी नांगर चालवून शापित भूमी नांगरली. वाघोलीच्या रामेश्वर भटाचे शिष्य पुरुषोत्तम भटाचा थयथयाट झाला आणि आता शिवाजी राजा मरेल अशी भिती या भटद्वयांनी पेरली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अश्या धमक्यांना पुरुन उरणार्या होत्या, जिजाऊंनी शिवबाला नांगर तसाच सुरू ठेवावा असे फर्मावले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल परंतु महाराष्ट्रातील गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. समतेचे, न्यायाचे, ममतेचे राज्य निर्माणासाठी वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे ठणकावून सांगितले. धार्मिक दहशत पसरविणाऱ्या पुण्यातील भटांनी रोवलेल्या सर्व पहारी उखडून त्यापासून स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी पडणार्या तलवारी तयार करण्यात आल्या संपूर्ण पुण्याची शापित पांढरी जमिन कसण्यास सुरुवात केली.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या 600 तरूण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला. तोरण्याची डागडुजी सुरू असतांना देवदेवतांच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्या, या मुर्तींचे काय जिजाऊंनी सल्ला दिला,“या मुर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका, या मुर्ती वितळवा आणि स्वराज्यतील मावळेरुपी जिवंत देव घडवा, हा महाराष्ट्र मुक्त करा.” पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करुन नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने बाळाजी हैबतराव या ब्राम्हण सरदाराच्या मदतीने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करुन झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात बाळाजी हैबतरावची फौज कापून काढली. स्वतः मल्हार कावजीच्या भाल्याने बाळाजी हैबतराव खाली पडला. उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करुन खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला, तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629 ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खुन केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेवून अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली.
1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करुन कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका
2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला.
3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे अठरापगड जातींच्या मावळ्यांसह जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले.
*जय जिजाऊ जय शिवराय*
🙏🙏🙏🙏
1.ससा नि कासव एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...