" लाभले आम्हास भाग्य | बोलतो मराठी || जाहलो खरेच धन्य | ऐकतो मराठी || धर्म, पंथ,जात एक|जाणतो मराठी ||
सुस्वागतम... 'Joyful Learning' या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत !!...श्री प्रमोद निंबा बोरसे प्रा.शिक्षक जि प केंद्रशाळा जुनेधडगाव. मो.9923229727

Sunday, 26 April 2020

आरोग्यम धनसंपदा

             मित्रांनो सध्या कोविड 19 या महामारीने सर्व जगाला lockdown करून टाकलयं..गल्ली पासून दिल्ली पर्यंत आणि चीन पासून अमेरिका पर्यंत भल्याभल्याना आपल्या घरात कैद करून टाकलयं..त्यामुळे याचा आपल्या आरोग्यवर दूरगामी परिणाम होतोय.
            मित्रांनो प्रत्येकाचं आरोग्य हे प्रत्येकाच्या हातातच असते.मग ते शारीरिक असो किंवा मानसिक असो."तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" असे आपण वाचलेच  असेल,आणि हि ओळ अगदी आपल्या बाबतीत  खरी ठरते.माणसाला कुठलेही व्यसन जडण्यामागे तो स्वतःच जबाबदार असतो,जबाबदार असतात त्याच्या वाईट सवयी पण दोष देतो ते परिस्थितीला ,हि केवळ एक पळवाट आहे.असो हे झालं  शरीरीक आरोग्याबाबत.
              मी तर म्हणतो माणसाच्या शारीरिक आरोग्यापेक्षाही त्याचे मानसिक आरोग्य उत्तम असनं हे कधीही चांगलंच.कारण माणूस शारीरिकदृष्ट्या धडधाकड असला आणि मनोरुग्ण असला तर त्याच्या शरीरीक क्षमतेचा तो पूर्णर्थाने वापर करूच शकत नाही, तसेच त्याच्या कडून काही विधायक कार्य घडणे देखील दुरापस्तच म्हणावे लागेल.समाजातील घडत असलेले गुन्हे,अत्याचार ,बलात्कार हे मानसिक अनारोग्याची लक्षणे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
      इंग्रजीत एक म्हण आहे "sound mind in sound body".निरोगी शरीरात निरोगी मन वास करते....हे जर खरं असेल तर बळी तो कान पिळी या म्हणी प्रमाणे सुदृढ शरीराच्या व्यक्तींकडून बहुतेकदा निर्बलांवर अत्याचार होतात,हे हि तेवढंच खरं.मग माणसांनी निरोगी राहू नये का??सर्वच निरोगी माणसे अत्याचारी असतात का?..तर नाही..आपण निरोगी (शारीरिक दृष्ट्या आरोग्य संपन्न) आणि सुदृढ (शारीरिक दृष्ट्या बलदंड )यांच्यात गफलत करत आहोत.
        सामाजीक स्वास्थ टिकवून ठेवायचे असेल तर निरोगी ,सुदृढ शरीराबरोबरच मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे.."इच्छा असेल तर मार्ग दिसेल" असे म्हणतात .येथे इच्छा हि शारीरिक व मानसिक अशा दोघांच्या अवस्था दाखवते...दोघांपैकी एक जरी कमकुवत असेल तर इप्सित साध्य होणार नाही..तुमच्या मनात खूप इच्छा आहेत..काहीतरी करून दाखवण्याची पण तुमचे शरीर जर तुम्हाला साथ देत नसेल तर ..? आणि शरीर धडधाकड आहे,कोणतेही काम सहज करू शकतं पण तुमचं मनचं त्यासाठी तयार होत नसेल तर ते शरीर धडधाकड असून काय कामाचं..? म्हणून माणसाच्या पर्यायाने समाजाच्या आरोग्यासाठी निरोगी शरीर व निरोगी मन दोन्हीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे व्यायाम, शरीराचा व मनाचा देखील.....
   शारीरिक व्यायामासाठी प्रामुख्याने धावणे, चालणे,पोहणे,सूर्यनमस्कार,जोर-बैठका घालणे इ.जे आपल्या वयाप्रमाणे प्रकृतीला झेपेल ते करावे.आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने,प्राणायाम,ध्यान ,चांगल्या पुस्तकांचे वाचन,आवडीची गाणी,उपदेशपर चित्रपट,धार्मिक ग्रंथांचे डोळसपणे वाचन,जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन..इ करू शकतो..
    तर चला मग व्यक्ती व्यक्ती आरोग्यसंपन्न बनू या..राष्ट्राला बलदंड बनवू या...कोरोनाला हरवू या..
                                             🙏🙏 प्रमोद बोरसे🙏🙏

Saturday, 25 April 2020


नमस्कार मित्रांनो आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली त्याबद्दल आभारी आहोत....श्री प्रमोद निंबा बोरसे.

गरुड झेप

*गरुडाचा पुनर्जन्म*

*गरुड हा सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त जगणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याच्या वयाच्या एका टप्प्यावर त्याच्या पंखातील ताकद कमी होते. मोठ्या झालेल्या पिसांचा भार वाढतो पण ती अशक्त होत असतात. त्याच्यापुढे दोन पर्याय असतात. अशक्त झालेली पिसे थोडी थोडी करत उपटून काढणे किंवा सर्व पिसे एकदम उपटून काढणे. स्वतःची पिसे उपटून काढणे हे खूप वेदनादायी काम असते. परंतु तो निर्णय घेतो आणि उंच डोंगरावर, जिथे कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊन बसतो, एखाद्या योगी असल्यासारखा*
*आपल्या अणकुचीदार चोचीने तो स्वतःची पिसे उपटून फेकू लागतो. वेदना सहन करत सर्व पिसे उपटून काढतो. सगळी पिसे उपटल्यावर विद्रुप, जखमांनी जर्जर दिसत असतो. पण काही दिवसांतच त्याला नवीन  पिसे येऊ लागतात. आणि तब्बल १५० दिवसांच्या हा जीवघेणा एकांतवास आणि वेदना सहन केल्यावर त्याला नवीन ताकदवान पंख पुन्हा मिळतात. ह्या नवीन पंखांनी तब्बल तीस वर्षांनी वाढलेले आयुष्य जगण्यासाठी तो सिद्ध होतो*
*ह्या नवीन पंखांसह घेतल्या जाणाऱ्या भरारीला 'गरुडाचा पुनर्जन्म' असे म्हटले जाते*

*आज आपला देशही अशाच अवस्थेत आहे. काही दिवसांचा काळ वेदना देणारा आहे. पण ह्या वेदना सहन करून आपला देश पुन्हा गरूडभरारी घेईल ह्यात काही शंका नाही*

PLS STAY HOME SAFE HOME AND SAVE INDIA🇮🇳

Thursday, 23 April 2020

सुस्वागतम...सुस्वागतम✒️✒️

आपणा सर्वांचे माझ्या joyful learning educational blog. वर सहर्ष स्वागत !!!

अहिराणी गोष्ट:-1 ससा नि कासव

                   1.ससा नि कासव                    एक व्हता ससा आणि एक व्हतं कासव.एक दिन ससा कासवले म्हणे,”मनासंगे दौड लावस का? कासव म्हणे ...